नाशिक जिल्ह्याला गारपीट, अवकाळीने झोडपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी जिह्यातील निफाड, सटाणा, देवळा, सिन्नरसह सात तालुक्यांना वादळी वारा, गारपिटीसह अवकाळीने झोडपले. यात कांदा, गहू, हरभरा, मका, द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटाने हिरावून घेतल्याने पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सरकारने तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

सटाणा तालुक्यातील ताहाराबाद, मुल्हेर, अंतापूर व परिसरात बुधवारी सायंकाळी तासभर वादळी वाऱयासह अवकाळी बरसला. या तडाख्याने काढणीला आलेले गव्हाचे पीक जमीनदोस्त झाले. कांदा, हरभऱ्यासह इतर रब्बी पिकांचे तसेच आंबा, भाजीपाल्याचे नुकसान झाले. काही भागांत गारपिटीनेही होत्याचे नव्हते केले.