बँक ऑफ इंडिया फसवणूक प्रकरण – माजी वरिष्ठ व्यवस्थापकासह तिघांना कारावासाची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बनावट लेटर ऑफ व्रेडिटच्या आधारे बँक ऑफ इंडियाची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने बँकेच्या माजी अधिकाऱयांसह तिघांना कारावासाची शिक्षा ठोठावली. हरित मेहता, अभय मेहता, मनोजकुमार माथूर आणि इलेश शहा अशी त्या आरोपींची नावे असून न्यायालयाने अनुक्रमे साडेतीन कोटी, एक कोटी व अन्य दोघांना 50 हजारांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.

2009 साली नरिमन पॉइंट येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत एचडीएफसी बँकेच्या नावाने एक बनावट ‘लेटर ऑफ व्रेडिट’ सादर करण्यात आले होते. बँकेचे तत्कालीन वरिष्ठ व्यवस्थापक मनोजकुमार माथूर यांनी गुन्हेगारी कट रचून या बनावट पत्राच्या आधारे सुमारे 3.55 कोटी रुपयांचे डिस्काऊंटिंग मंजूर केले. यातील 2.47 कोटी रुपये ‘इन्फिनिटी ट्रान्समिशन’च्या खात्यात जमा करण्यात आले, जे आरोपींनी काढून घेतले. तपासात हे पत्र बनावट असल्याचे उघड झाले, ज्यामुळे बँकेचे एकूण 3.4 कोटी रुपयांचे नुकसान झाले. विशेष न्यायाधीश अमित खारकर यांच्यासमोर या खटल्यावर सुनावणी घेण्यात आली तेव्हा न्यायालयाने दोन आरोपींना पाच वर्षांची तर दोन जणांना तीन वर्षांची कारावास आणि आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली.