लिटील चॅम्प शरयू दाते विवाहबंधनात अडकणार, केनियात बेस्ट फ्रेंडने केला प्रपोज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सारेगमप लिटिल चॅम्प स्पर्धेतून संगीत विश्वात पदार्पण करणारी प्रसिद्ध गायिका शरयू दाते लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिचा बेस्ट फ्रेंड विभास वाटवे याने दक्षिण आफ्रिकेतील केनिया पर्यटनाला गेले असताना शरयूला प्रपोज केला. या क्षणाचे टिपलेले फोटोग्राफ शरयूने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. ही गोड बातमी शेअर करत चाहत्यांसह मित्र मंडळींना सुखद धक्का दिला आहे.

शरयू तिचा बेस्टफ्रेंड विभाससोबत केनियातील मसाईमारा राष्ट्रीय अभयारण्यात पर्यटनासाठी गेली होती. गेल्या काही दिवसांपासून ती पर्यटनाचे सर्व फोटो आणि तिचा अनुभव इंस्टाग्रामवर पोस्ट करत होती. मात्र असे असतानाच तिने अचानक एक पोस्ट केली आणि इंस्टाग्रामवरील हत्यांसह मित्र मंडळींना सुखद धक्का दिला. तिने त्या पोस्टमध्ये म्हंटले की, ‘माझ्या होणाऱ्या नवऱ्याला भेटा’, माझा बेस्ट फ्रेण्ड जो आता माझा होणारा नवरा आहे, असं लिहिलं आहे. त्यासोबतच तिने विभास प्रपोज करतानाचे फोटोज देखील शेअर केले. या सुखद बातमीनंतर तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शरयूने टॅग केल्यानुसार विभास वाटवे असं तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव असल्याचं समोर आले.