… म्हणून भाजप निवडणूक आयोगाला ढाल बनवून पश्चिम बंगालमध्ये घाणेरडा खेळ खेळतोय, संजय राऊत यांनी फटकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काही तासांतच निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी सरकारच्या मुख्य सचिव नंदिनी चक्रवर्ती यांच्यासह राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश दिले. त्यावरून सध्या तिथलं वातावरण चांगलंच तापलं आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही निवडणूक आयोगाने अद्याप सुधारित मतदार याद्या जाहीर केलेल्या नाहीत. केंद्रातील भाजप सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी यावरून भाजपला फटकारले आहे. ”बंगालची प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे खिळखिळी करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवरून केली आहे.

ममता बॅनर्जी यांच्या भाजपविरोधी लढ्याला पाठिंबा देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. ”पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींना हरवणे कठिणच नाही तर अशक्य आहे. त्यामुळेच भाजप निवडणूक आयोगाला ढाल बनवून घाणेरडा खेळ खेळतेय. निवडणूक आयोगाचे पश्चिम बंगालमधील कार्यालय भाजपच्या कंट्रोल रुम सारखे बनने हे देशासाठी धोकादायक आहे. ममता दिदी वाघिण आहेत. देशाची जनता दिदी सोबत आहे. आम्ही सर्व प्रत्येक लढ्यासाठी तयार आहोत, असे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.