
केंद्र सरकारने देशातील ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजाराविरोधात कडक कारवाई करत 300 वेबसाइट्स आणि अॅप्स ब्लॉक केले आहेत. सरकारने आतापर्यंत एकूण 8 हजार 400 प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली आहे. यापैकी 4 हजार 900 वेबसाइट्स ऑनलाइन गेमिंग कायदा लागू झाल्यानंतर ब्लॉक करण्यात आल्या आहेत. बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजी आणि जुगाराशीसंबंधित प्लॅटफॉर्म्सवर कारवाई करण्यात आली आहे. या वेबसाइट्सद्वारे मोठय़ा प्रमाणावर बेकायदेशीर व्यवहार आणि जुगाराला प्रोत्साहन मिळत होते. हे सगळे रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. हे पाऊल डिजिटल स्पेस सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर कृत्यांवर आळा घालण्यासाठी उचलण्यात आले आहे, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.


























































