
कर्ज घेताना आपली खरेच गरज आहे का आणि ते कर्ज फेडण्याची ऐपत आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. त्यानुसार पावले उचला.
कोणतीही वस्तू घेण्यापूर्वी स्वतःला विचारा. या वस्तूशिवाय माझे अडणार आहे का? पर्सनल लोन, व्रेडिड कार्ड किंवा ऑटो, घरगुती उपकरण कर्जाचे प्रमाण वाढले आहे.
सोने ही आपली शेवटची शिदोरी असते. सण साजरा करण्यासाठी किंवा चैनीसाठी सोने गहाण ठेवणे म्हणजे आपल्या आर्थिक पायाला स्वतःच सुरुंग लावण्यासारखे आहे.
पर्सनल लोनच्या जाळ्यात अनेक तरुण अडकले असून त्यांच्या पगारापेक्षा त्यांचा ईएमआय अधिक आहे. ग्रामीण भागात तर कर्ज देणाऱया पंपन्यांचा सुळसुळाट आहे.
अचानक येणाऱया संकटासाठी किमान सहा महिन्यांच्या खर्चाइतकी रक्कम बाजूला ठेवा. ‘इन्स्टंट लोन’ अॅप्सपासून दूर राहा. कर्जाचा निर्णय विचारपूर्वक घ्या.


























































