हे करून पहा – रणरणत्या उन्हात घर थंडगार ठेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नैसर्गिकरीत्या आणि कमी खर्चात घर थंडगार ठेवायचे असेल तर घरगुती टिप्स फायदेशीर ठरू शकतात. उन्हाळ्यात दुपारच्या वेळी खिडक्या आणि पदडे लावून घ्या. घरात गरम हवा येत नाही. अनावश्यक इलेक्ट्रिक उपकरणे बंद ठेवा

घरात कोरफड, मनी प्लांट, अरेका पाम रोपटी लावा. त्यामुळे घरातील ओलावा टिकून हवा थंड राहते. उन्हाळ्यात सुती कपडय़ांचा आणि चादरींचा वापर करा. सूर्यास्त झाल्यावर घराच्या खिडक्या उघडून ठेवा. हवा खेळती राहते.