चिंताजनक! अवघ्या वर्षभरात 49 लाख मुलांचा मृत्यू, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2024 या वर्षात जगभरात जवळपास 49 लाख मुलांचा मृत्यू हा पाच वर्षे पूर्ण होण्याआधीच झाला आहे, अशी धक्कादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालातून समोर आली आहे. डब्ल्यूएचओच्या लेवल्स अँड टेंर्ड्स इन चाइल्ड मोर्टेलिटच्या अहवालानुसार, ज्या 49 लाख मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यात 23 लाख मृत्यू हे नवजात बालकांचे आहेत. हे मृत्यू रोखता आले असते, असेही अहवालात म्हटले आहे.

पाच वर्षांपेक्षा कमी वयातील मुलांचा मृत्यू दर कमी झाला आहे. परंतु, याचा वेग आता थंडावल्याचे दिसत आहे. या मृत्यूमागे वेळेआधी मुलांचा जन्म होणे यासारखी 36 टक्के कारणे आहेत. जन्मावेळी काही समस्या उद्भवल्याने 21 टक्के नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, संसर्गजन्य आजार हेसुद्धा कारण ठरले आहे. जर गुणवत्तापूर्ण प्रसूती सेवा, प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी यांची उपलब्धता आणि नवजात बालकाच्या देखरेखीसाठी सुविधा वेळेत उपलब्ध असत्या तर यातील बरेच मृत्यू हे रोखता आले असते, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पहिल्यांदा या रिपोर्टमध्ये गंभीर कुपोषणामुळे मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. 1 महिना ते पाच वर्षांखालील एक लाख मुलांच्या मृत्यूचे कारण हे कुपोषण आहे. एकूण बाल मृत्यूदरांत जवळपास पाच टक्के आहे. ही संख्या आणखी वाढली असती. कारण, अनेक प्रकरणांमध्ये कुपोषणाची नोंद केली जात नाही.  पाकिस्तान, सोमालिया आणि सुडानसारख्या देशांमध्ये कुपोषणांचे प्रकार जास्त झाले आहेत. या अहवालानुसार, मलेरियाने 17 टक्के मृत्यू झाले आहेत.