
सशस्त्र सीमा दलात कॉन्टेबलच्या एकूण 827 जागांसाठी भरती केली जात आहे. या पदांमध्ये कॉन्स्टेबल व्हेटरिनरी (35), कॉन्स्टेबल ड्रायव्हर (553), कॉन्स्टेबल गार्डनर (41), कॉन्स्टेबल वॉटर पॅरिअर (05), कॉन्स्टेबल कॉब्लर (25), कॉन्स्टेबल टेलर (41), कॉन्स्टेबल वॉशरमन (74), कॉन्स्टेबल न्हावी (43), कॉन्स्टेबल वेटर (03), कॉन्स्टेबल कारपेंटर (07), कॉन्स्टेबल नार्ंसग ऑर्डर्ली (01) अशा एकूण 827 जागांची भरती केली जाणार आहे. या सर्व पदांसाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 19 एप्रिल 2026 पर्यंत आहे. परीक्षा नंतर कळवली जाईल. अर्ज करणारा उमेदवार कमीत कमी 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित पदासाठी कोर्स केलेला असावा. भरती संबंधी सविस्तर माहिती https://recruitment.sW.gov.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
























































