रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण – यूपीमध्ये 14 व्या आरोपीला पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घरावर बेछूट गोळीबार केल्याप्रकरणात मुंबई पोलिसांनी 14 वी अटक केली. प्रदीप शर्मा ऊर्फ गोलू (23) असे त्याचे नाव असून त्याला यूपीमध्ये पकडण्यात आले.

बिश्नोई गँगचा पंटर शुभम लोणकर याने त्याच्या अन्य साथीदारांच्या मदतीने रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार घडवून आणला होता. या प्रकरणात आग्रा येथे राहणारा प्रदीप शर्मा ऊर्फ गोलू या तरुणाचा देखील सहभाग असल्याचे निष्पन्न होताच सपोनि अमोल माळी, उपनिरीक्षक स्वप्नील काळे व पथकाने आग्रा गाठत त्याला अटक केली.