वडाळ्यात पत्नीची तर अंधेरीत अल्पवयीन मुलाची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वडाळ्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पत्नीची तर अंधेरी पश्चिमेकडे दोघा अल्पवयीन मित्रांनी 15 वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली.

वडाळ्याच्या गणेश नगरात राहणाऱया महेश वाड (34) याने दारू पिण्याच्या कारणावरून वाद घालत पत्नी कविता वाड (29) हिला 13 मार्च रोजी राहत्या घरात लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली होती. शिवाय कविताच्या चेहऱयावर मोबाईल जोरात फेकून मारला होता. तीन दिवसांनी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी वडाळा पोलिसांनी महेश वाड याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

अंधेरी पश्चिमेकडील डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघा 17 वर्षीय मित्रांनी मिळून त्यांच्या 15 वर्षीय मित्राची गळा आवळून घरातच हत्या केल्याचा प्रकार समोर आला. गळा आवळल्यामुळे मुलगा निपचित पडून राहिल्यानंतर त्याला तसेच घरात ठेवले. मग त्याच्या वडिलांना संपर्क साधून त्याने आत्महत्या केल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी दोघा मित्रांना ताब्यात घेतले.