
कुटुंबीयांनी घरी मांजर पाळण्यास विरोध केल्याच्या रागातूीन 23 वर्षीय महिला डॉक्टरने जीवन संपवल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. हैदराबादमधील अलवाल परिसरात ही घटना घडली. टी. प्रिन्सी उर्फ श्रेष्ठा असे मयत डॉक्टरचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत डॉक्टर आई आणि आजीसोबत राहत होती. काही आठवड्यांपूर्वी प्रिन्सीने एक मांजर घरी आणले होते. मात्र हे मांजर आणल्यापासून प्रिन्सीला सतत सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत होता. यामुळे प्रकृतीच्या कारणातून घरी सतत वाद सुरू होता.
यात कारणातून शुक्रवारी संध्याकाळी घरी कुणीही नसताना प्रिन्सीने टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं. कुटुंबीय घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी अलवाल पोलिसात घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
























































