पोहताना लष्करी अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका, बेळगावच्या कमांडो विंगमधील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रशिक्षणादरम्यान पोहताना हृदयिकाराचा झटका आल्याने लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बेळगावातील नानावाडी येथील कमांडो विंग येथे ही घटना घडली. लेफ्टनंट अमित सिंग असे मृत्यू झालेल्या लष्करी अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लेफ्टनंट अमित सिंग हे मूळचे हरियाणाचे रहिवासी असून बेळगावातील विंग कमांडो येथे कमांडो प्रशिक्षण घेत होते. प्रशिक्षणादरम्यान स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना सिंग यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर लाईफ गार्डने त्यांना तात्काळ पाण्यातून बाहेर काढले आणि लष्करी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.