
मध्यपूर्वेतील तणाव दिवसागणिक अधिक गंभीर होताना दिसत आहे. इराण आणि इस्त्रायल अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण आता सुरु झालेले आहे. यामुळेच आता जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलमार्गांपैकी एक असलेल्या या सामुद्रधुनीतून सुमारे 20% तेल वाहतूक होते. मात्र सध्याच्या संघर्षामुळे, जहाजांची वाहतूक मोठ्या प्रमाणात घटली आहे. तसेच यामुळेच आता हजारो खलाशी समुद्रात अडकले आहेत. अनेक तेल टँकर्सना पर्यायी मार्ग वापरावा लागत आहे. त्यामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर थेट परिणाम झालेला आहे.
अमेरिका इराण संघर्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कठोर इशारा दिलेला आहे. या इशाऱ्यांतर्गत त्यांनी होर्मुझ मार्ग खुला ठेवण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे इराणनेही प्रत्युत्तर देत शत्रू देशांच्या जहाजांवर निर्बंध घालण्याचे संकेत दिले आहेत. दोन्ही बाजूंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे हे युद्ध आता अधिक तीव्र होण्याची शक्यता दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे (IEA) संचालक फातिह बिरोल यांनी कॅनबेरा येथील ‘नॅशनल प्रेस क्लब’मध्ये भाषण दिले. यावेळी त्यांनी सध्याच्या ऊर्जा संकटाची तुलना १९७० च्या दशकातील संकटांशी आणि रशियाने २०२२ मध्ये युक्रेनवर केलेल्या आक्रमणाशी केली आहे. त्यांनी पुढे सांगितले, “आज जागतिक अर्थव्यवस्थेसमोर एक अत्यंत गंभीर धोका उभा राहिला आहे आणि मला मनापासून आशा आहे की, हा प्रश्न लवकरात लवकर सुटेल… जर हे संकट याच दिशेने पुढे जात राहिले, तर कोणताही देश याच्या परिणामांपासून अलिप्त किंवा सुरक्षित राहणार नाही. त्यामुळेच, यावर मात करण्यासाठी जागतिक स्तरावरील प्रयत्नांची नितांत गरज आहे.”
























































