
अहमदाबाद महामार्गावर ढेकाळे येथील वाघोबा खिंडीत अज्ञात वाहनाच्या धडक बसून दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी सायंकाळी घडली. दरम्यान, याच महामार्गावर सातिवली परिसरात तयार करण्यात आलेल्या स्पीड ब्रेकरमुळे दिवसभरात अनेक अपघात होऊन वाहतूककोंडी निर्माण झाली होती.
वाघोबा खिंड परिसरात शनिवारी सायंकाळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीवरील तिघांनाही अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच मनोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन मनोर ग्रामीण रुग्णालयात हलवले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून ते विक्रमगड तालुक्यातील मलवाडा पाडा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


























































