शेअर बाजार धडाम… 14 लाख कोटी स्वाहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेअर बाजारात सोमवारी जोरदार घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 1838 अंकांची घसरण होऊन 72,696 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 601 अंकांनी घसरून 22,512 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना जोरदार झटका बसला असून त्यांच्या संपत्तीत 14 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे. निफ्टीमध्ये सर्वात जास्त घसरण झालेल्या शेअर्समध्ये श्रीराम फायनान्स, ट्रेंट, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन कंपनी, जिओ फायनान्शियल चा समावेश आहे. तर सर्वात जास्त फायद्यात असलेल्या शेअर्समध्ये एचसीएल टेक्नोलॉजी, ओएनजीसी, पावर ग्रीड कॉर्प आणि इन्पहसिसच्या शेअर्सचा समावेश आहे. शेअर बाजार घसरण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत. यामध्ये कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. याचा थेट परिणाम बाजारावर दिसत आहे. डॉलरच्या तुलनेत हिंदुस्थानी रुपयामध्ये होत असलेली घसरण हेही कारण आहे.