
अमेरिका, इस्रायल-इराण यांच्यातील युद्ध आता जागतिक महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाच दिवस इराणच्या उर्जा केंद्रावर हल्ला करू नये, असे निर्देश दिले आहेत. तसेच इराणसोबत सकारात्मक वाटाघाटी सुरू असल्याचे सांगितले. मात्र, इराणने याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला असून युद्ध अधिक निकराने लढण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेचे सचिव मार्को रुबिओ यांनी मंगळवारी हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. या दोन्ही अधिकाऱ्यांनी आखाती सद्यस्थितीवर चर्चा केली. परस्पर सहकार्य आणि प्राधान्यक्रम ठरवत एकत्रितपणे काम करणे सुरू ठेवण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. ही माहितीअमेरिकेचे मुख्य उप-प्रवक्ते टॉमी पिगॉट यांच्याकडून देण्यात आली आहे.

























































