
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाची जलतरणपटू सिया देवरुखकर हिने बालेवाडी येथे पार पडलेल्या खेलो इंडिया अस्मिता महिला जलतरण लीग स्पर्धेत पश्चिम विभागीय स्तरावर सुवर्णझेप घेत चार पदकांची कमाई केली. महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्य प्रदेश, गोवा, गुजरात आणि राजस्थान या राज्यांतील स्पर्धकांवर मात करत सियाने आपला ठसा उमटवला.
सियाने 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक आणि 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात सुवर्णपदक पटकावत वर्चस्व गाजवले. तसेच 50 मीटर आणि 100 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात कांस्यपदक जिंकत एकूण 2 सुवर्ण व 2 कांस्य पदके आपल्या नावावर केली. या दमदार यशामुळे सियाची 12 ते 14 एप्रिल 2026 दरम्यान अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी चारही प्रकारांत निवड झाली आहे.


























































