भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या अध्यक्षपदी अनिल देसाई,सुनील शिंदे कार्याध्यक्ष, दिनेश बोभाटे सरचिटणीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या अध्यक्षपदी शिवसेना नेते – खासदार अनिल देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या कार्याध्यक्षपदी आमदार सुनील शिंदे, शरद जाधव, सुरेश नार्वेकर, संजय शिर्पे यांची तसेच सरचिटणीसपदी दिनेश बोभाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या द्वैवार्षिक अधिवेशनात नवीन मध्यवर्ती कार्यकारणी समितीची घोषणा करण्यात आली. भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघ ही संघटना शिवसेना अंगीकृत अखिल भारतीय पातळीवरील हिंदुस्थानातील सर्व राज्यात विस्तारलेली मान्यताप्राप्त संघटना असून एलआयसी जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन, न्यू इंडिया इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स तसेच इसीजीसी व इन्शुरन्स इन्स्टिटयूट ऑफ इंडियासहित खासगी क्षेत्रातील विमा पंपन्यांत कार्यरत आहे.

इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे ः संघटन सचिव ः महेश लाड, गोपाळ शेलार, अजय दळवी, संजय डाफळ, अंकुश कदम, सचिन खानविलकर, अजय गोयाजी.  वरिष्ठ उपाध्यक्ष ः श्रीकांत खानोलकर, अजित रानडे (नागपूर), शरद एक्के, अशोक रेडीज. उपाध्यक्ष ः हेमंत म्हात्रे, मंगेश कदम, राजेंद्र पंजारी, शरद नानल, चंद्रकांत हवाले, वृषाली मांजरेकर, हेमंत सावंत, नितीन विखारे, आर. सुरेशकुमार (बंगळुरू), उमेश शुक्ला, प्रताप चव्हाण, संजय पाटकर, मंगेश करंजारकर (नागपूर), उदय साळवी, बसवराज नुच्ची (बंगळुरू), महुआ मुखर्जी (कोलकाता), प्रफुल सुदामे (पुणे), मुकेश दुबे (भोपाळ), ललित महाजन (दिल्ली), सुरेश शर्मा (लुधियाना), अशोक मीना (जयपुर), दक्षता वैद्य (पुणे), जे. दासगुप्ता (गुवाहाटी), सुधीर शर्मा (कानपूर), पंकज शहा (अहमदाबाद), पी. चेन्नास्वामी (कोइंबतूर), सुशील बीजलवार (देहरादून), राजा मुखर्जी (कोलकाता), एमवीवीएसएन मूर्ती (हैदराबाद), जाबा पॉल (चेन्नई), अजय शेरावत (चंदीगड), शर्वरी शेटये, बि. डी मोटा, बिपिन नवसारीवाला, काwस्तुभ कुलकर्णी,  सिद्धेश भांगे, जगन्नाथ ब्रीद, शशिकांत भवड, मनोज कोळी, जयेश कुमार सक्सेना. सचिव ः आल्हाद नाईक, दीपक मोरे, अजय पथरोड, संजय सावंत, आनंद कांबळी, महेश कदम, मिलिंद सारंग, संतोष चांदे, सचिन हल्नोर (पुणे), संजय माने, समीर भिडू, सुबोध सावंत, संजय चेवले, सुनील भोसले, अनंत वाळके, प्रीती पावसकर, शिल्पा शिंदे, जगदीश वेताळ, किरण चोरगे, प्रशांत कांबळे, समीर बांदिवडेकर, आशिष दुरुगडे, सुमित बने, जी. शुन्मुगंथनम (मदुराई), शरमद अंदुर्लेकर, गजानन मेहता, एस. जीवन (चेन्नई), लक्ष्मीकांत चूडये (संभाजीनगर), निलेश शेलार, निखिल कुलकर्णी (सातारा), कुमार आशुतोष (पटना), सीबी वी. (कोइंबतूर), संदेश इंगुलकर (पुणे), एस. जनार्दन (वैजाग), गोलेख दास (भुवनेश्वर), पी. शिनु (मदुराई), पंकज राणा (बडोदा), डिगेश्वर पागोटे (नागपूर), संजय जोशी.

संयुक्त सचिव- चंद्रकांत पाटील, विनोद येरुणकर मिलिंद आंब्रे, देवेंद्र पवार, हारून शेख, सागर घुगे, देवेंद्र शर्मा (शिमला), निलेश जुवेकर, अनुप वानखेडे (अमरावती), लक्ष्मी जोशी, हरीश दुधेरेजिया (राजकोट), रवी मुलेकर, मनीष खेडेकर, उल्हास चव्हाण, विद्याधर सावंत, ज्योती सोनार, एम.जे.पटेल (पुणे), चिंतामणी वाकर, एकनाथ दामसे (पुणे).

खजिनदार ः सचिन लोके.

सहखजिनदार ः अजिंक्य खेडेकर.

कार्यालयीन प्रभारी ः ललित अट्टवार.