Iran War – मध्य पूर्वेतील तणाव अधिक चिघळणार; आता सौदी अरेबियाचाही युद्धात सहभाग, ट्रम्प यांचे संकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियाच्या संभाव्य सहभागाचे संकेत दिले आहेत. त्यांनी सौदी युवराज मोहम्मेद बिन सलमान यांचे कौतुक करत त्यांना योद्धा असे संबोधले आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे मध्य पूर्वेतील संघर्ष आता अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धात नवीन देशांचा सहभाग वाढल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Iran War – कुवैत, बहरीनमध्ये पुन्हा हल्ले सुरू; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला

मध्य पूर्वेतील तणाव आधीच वाढत आहे, आता या अशा परिस्थितीमध्ये हा तणाव चिघळणार असे दिसत आहे. अशा परिस्थितीत सौदी अरेबिया या युद्धात उतरला, तर हा संघर्ष मोठ्या प्रादेशिक युद्धात रूपांतरित होऊ शकतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. या युद्धाचा परिणाम केवळ मध्य पूर्वेपुरता मर्यादित राहणार नाही. विशेषतः तेल पुरवठा आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. मध्यपूर्व हा तेल उत्पादनासाठी महत्त्वाचा प्रदेश असल्याने, संघर्ष वाढल्यास जागतिक बाजारपेठ अस्थिर होऊ शकते.