
ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिरात तब्बल 48 वर्षांनंतर मंदिरातील रत्न भंडारची मोजदाद अखेर बुधवारी सुरू करण्यात आली. श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अधिकृत कर्मचारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पारंपरिक पद्धतीचा पेहराव करून मंदिरात आले. मंदिरातील रत्न भंडारची मोजदाद सुरू असल्याने दैनंदिनी पूजा-अर्चना करण्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. भाविकांना मंदिराच्या बाहेर लावलेल्या बॅरिकेडमधून दर्शन घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. याआधी 13 मे ते 23 जुलै 1978 मध्ये रत्न भंडारची मोजदाद करण्यात आली होती.



























































