
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे. या प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल करणे हा गृह विभागाचा कुटिल डाव असल्याची टीका त्यांनी केली आहे.
भोंदू अशोक खरात प्रकरणाने राज्यातील महायुती सरकार पोखरले आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाचे ५८ व्हिडिओ असल्याचे सांगितले जात असेल तरी त्यांची संख्या मोठी आहे. पण गृहविभागाकडून काही सिलेक्टिव्ह व्हिडिओच लिक केले जात आहेत, त्यामागे मोठे षडयंत्र आहे. खरातच्या सीएकडे मोठ्या प्रमाणात घबाड सापडल्याच्या बातम्या येत आहेत, हा पैसा नेमका कोणाचा असा प्रश्नही हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
इंधन टंचाईबाबत फडणवीसांचे विधान दिशाभूल करणारे..
देशात पेट्रोल पंपावर व एलपीची गॅस साठी रांगा लागत आहेत, याचे खापर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर फोडले हे हास्यास्पद आहे. काँग्रेस व राहुल गांधी अफवा पसरवत नाहीत तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच संसदेत भाषण करताना कोरोनासारखी परिस्थिती असल्याचे विधान केले होते, त्यातूनच लोकांमध्ये लॉकडाऊनची भिती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे मोदी सराकरचे परराष्ट्र धोरण फसलेले आहे, त्यामुळे जनतेला इंधन व एलपीजी टंचाईला सामारो जावे लागत आहे व भाजपा सरकार मात्र आपली जबाबदारी झटकून काँग्रेसवर आरोप करत आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.



























































