
राज्य सरकारने मंगळवारी दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या सात महिन्यात दिव्यांग कल्याण विभागातून बदली करण्यात आली आहे. आता त्यांची बदली आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन, महसूल व वन विभागाचे सचिव या पदावर करण्यात आली आहे. गेल्या 21 वर्षातील ही त्यांची 24 वी बदली आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद सिंगल यांची बदली मृद आणि जलसंधारण विभागाच्या प्रधान सचिवपदी झाली आहे, तर सिंगल यांच्या जागी तुकाराम मुंढे यांना आणण्यात आले आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग यांची बादली कृषी विभागात सचिव म्हणून झाली आहे.































































