इराणच्या भूमीवर येणाऱ्या आक्रमकांचे पाय कापू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शत्रूच्या सैनिकांनी आमच्या भूमीवर उतरण्याचा प्रयत्न केल्यास इराणचे लष्कर जोरदार प्रत्युत्तर देईल. आक्रमकांचे पाय छाटून टाकू, असा इशारा इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने दिला.

अमेरिकेचे हजारो सैनिक इराणच्या भूमीवर उतरण्यास सज्ज आहेत. खर्ग बेटाला लक्ष्य करून इराणचे तेल ताब्यात घेणे याला आमचे प्राधान्य असल्याचे जाहीर वक्तव्य ट्रम्प यांनी केले होते. त्यावर, ‘‘आम्हीही तयार आहोत. आक्रमकांची वाटच बघत आहोत,’’ असे आयआरजीसीचे प्रवक्ते इब्राहिम झुल्फघरी यांनी ठणकावले.

चेचेन सैनिक इराणच्या पाठिंब्यास तयार

अमेरिकेचे सैनिक इराणच्या भूमीत घुसल्यास इराणच्या समर्थनार्थ युद्धात उतरण्याची घोषणा चेचेन लष्कराने केली. हे धर्मयुद्ध असल्याचे चेचेन लष्कराने म्हटले आहे. चेचेन हा रशियाचा निम-स्वायत्त प्रांत आहे. चेचेनने युद्धात उडी घेणे म्हणजे रशिया युद्धात उतरण्यासारखे आहे.