
ट्रम्प यांच्या विधानाने युद्धाची भूमिका स्पष्ट न झाल्याने सोने-चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण झाली. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे.
सोन्याच्या भावात 5 हजार 346 रुपयांची घसरण झाल्याने सोने आता प्रति तोळा 1 लाख 46 हजार रुपयांवर तर चांदीच्या दरात 15 हजारांची घसरण झाल्याने चांदी 2.25 लाखांपर्यंत खाली आली आहे. सोने 4,700 डॉलर प्रति औंसपर्यंत खाली घसरले, तर चांदीसुद्धा 73 डॉलर औंसपर्यंत खाली आले. ट्रम्प यांच्या भाषणामुळे कोणतीही स्थिती स्पष्ट न झाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता वाढली आहे. डॉलरची मजबुतीमुळे किमती घसरल्या. युद्धामुळे सोने 34 दिवसांत 13,590 तर चांदी 42,040 रुपयांनी स्वस्त झाली.



























































