
एखाद्या घरात लग्नकार्य असले, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. एका लग्नघरातील नणंद-भावजयीचा भन्नाट डान्स सध्या व्हायरल होत आहे. दोघी भन्नाट ठुमके मारत भान हरपून नाचत आहेत. व्हिडीओ पाहून कोण सरस ते सांगता येत नाही. दोघींच्या टॅलेंटचे कौतुक होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर siddhamkomal या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला लाखो ह्यूज मिळाले आहेत.




























































