
अंडी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे चांगले असते. कारण कमी तापमानात बॅक्टेरियांची वाढ मंदावते आणि अंडय़ांचा ताजेपणा टिकतो. फ्रिजच्या दरवाजात तापमान सतत बदलत असते. अंडी फ्रिजच्या आतल्या शेल्फवर ठेवा, दरवाजात नको.
अंडय़ाचे टोक खाली आणि गोल भाग वर ठेवावा. त्यामुळे अंजडय़ातील पिवळा भाग स्थिर राहतो आणि अंडे जास्त काळ ताजे राहते. रेफ्रिजरेटर नसेल तर अंडी थंड, कोरडय़ा आणि सावलीतल्या ठिकाणी ठेवावीत.


























































