‘ओरियान’मधून अशी दिसते पृथ्वी… अंतराळवीरांनी टिपले विलोभनीय दृश्य!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नासा’च्या ‘आर्टेमिस-2’ मोहिमेअंतर्गत ओरियन हे यान नुकतेच चार अंतराळवीरांना घेऊन चंद्राकडे झेपावले. या चांद्रप्रवासात मागे वळून पाहताना त्यांना दिसले ते आपल्या घराचे म्हणजेच पृथ्वीचे विलोभनीय दृश्य! कमांडर रीड वाईजमन यांनी 1.80 लाख

कि.मी.वरून आपल्या टॅबवर टिपलेली पृथ्वीची ही अद्भुत छायाचित्रे म्हणजे विज्ञानाची किमयाच म्हणावी लागेल. ओरियनच्या खिडकीतून डोकावताना कमांडर रीड यांना पृथ्वी दिसली आणि पुढचा सगळा विलक्षण चमत्कार छायाचित्रांच्या रूपाने जगासमोर आला. पृथ्वीच्या मागे मावळतीला निघालेले सूर्यनारायण आणि या संधीप्रकाशाच्या रंगरेषा धरित्रीच्या अंगाखांद्यावर स्पष्ट दिसत आहेत. उत्तर ध्रुवावर निळसर आणि हिरव्या रंगाची छटा बघायला मिळत आहे.