Mumbai crime news – वृद्धांना टार्गेट करणाऱ्या तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रस्त्याने जाणाऱ्या वृद्धांना टार्गेट करून दागिने पळवणाऱया तिघांना साकीनाका पोलिसांनी अटक केली. संतोष चौरे, बालाजी पवार आणि लक्ष्मण पवार अशी त्या तिघांची नावे आहेत. त्यांच्या अटकेने 13 गुह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले.

तक्रारदार महिलेला तिघा आरोपींनी मोफत साडी वाटपाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून दागिने पळवून नेले. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून साकीनाका पोलिसांनी गुन्हा नोंद केला. परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. तपासासाठी एक पथक तयार केले. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक माहितीच्या आधारे संतोषला डोंबिवली येथून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत बालाजी आणि लक्ष्मणचे नाव समोर आले. त्या दोघांना देखील पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी एकूण 15 लाख 46 हजार रुपयाचे सोन्याचे दागिने जप्त केले.