युद्धामुळे निर्यात ठप्प, केळी 400 रुपये क्विंटल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्धापूर तालुक्यातील 70 ते 80 टक्के क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली आहे. मात्र आखाती युद्धामुळे केळी अवघ्या 400 रुपये क्विंटल दराने विकली  जात असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

गतवर्षी मे महिन्यात लागवड केलेली केळी एप्रिलमध्ये काढणीस येताच शेतकऱयांना चांगल्या दराची अपेक्षा होती. मात्र आखाती युद्धामुळे व्यापाऱयांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याने अनेक केळीचे घड शेतातच पडून आहेत. काही ठिकाणी केळी झाडावरच पिकून खराब होत आहेत. यामुळे अनेक शेतकरी काढणीस आलेली केळी जनावरांना चारा म्हणून वापरत आहेत. शेजारील गावातील दोन शेतकऱयांनी केवळ 400 रुपये दर मिळत असल्याने सुमारे चार-चार हजार केळीचे घड कापून जनावरांना टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या निर्णयामुळे संबंधित शेतकऱयांना लाखो रुपयांचा फटका बसल्याने शेतकऱयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून केळी उत्पादक शेतकऱयांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

चार एकरातील टरबूज जाग्याकरच सडले…

प्रचंड कष्टातून टरबुजांची फळबाग बहरली… पीकही जोमदार आले… पण आखाती देशातील युद्धाचा फटका बसला. खरेदीदारच नसल्याने 4 एकर शिकारातील हिरकेगार टरबूज जाग्याकरच सडल्याने नायगांक तालुक्यातील देगाक येथील शेतकरी बळकंत बेंद्रे यांच्या मेहनतीकर पाणी फिरले. यात त्यांचे तब्बल 15 लाख रुपयांचे नुकसान झाले.