
चर्चगेट स्थानकालगत असलेल्या बेस्ट बस डेपो येथील टाटा गार्डनमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. दगडाने डोके ठेचून ही हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा नोंदवून आझाद मैदान पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. अखेर सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक बाबींच्या आधारे शोध घेत पोलिसांनी फोर्टच्या पी डिमेलो रोड येथे राहणाऱ्या आनंद जाधव (52) याला पकडले. त्याने त्याच्या ओळखीचा राहुल पंजवानी ऊर्फ पंजाबी (52) याची दगडाने डोकं ठेचून हत्या केल्याची कबुली दिली.


























































