
पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराच किंग्सचा संघ सध्या तीन सामन्यांच्या विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. मात्र, संघाच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर कौटुंबिक भेटीसाठी रजेवर गेला होता. याच दरम्यान सिडनीमधील मारूब्रा येथे मंगळवारी मद्यपान करून गाडी चालवल्याच्या आरोपावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉर्नरची ब्रेथ अनालायझर चाचणी केली असता त्याचे रिडींग 0.104 आले आहे, जे ऑस्ट्रेलियातील कायदेशीर मर्यादेपेक्षा दुप्पट आहे. रविवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास मारूब्रा येथील मालाबार रोडवर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करून पोलीस ठाण्यात नेले. या ‘मिडल-रेंज’ गुन्ह्यासाठी त्याला 7 मे 2026 रोजी डाऊनिंग सेंटर स्थानिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. NDTV ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
IPL 2026 – फिट नसाल तर खेळू नका; सुनील गावसकर भडकले, विदेशी खेळाडूंवर साधला निशाणा
या घटनेमुळे पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्सच्या मोहिमेवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. वॉर्नर सध्या संघाचा कर्णधार असून त्याच्या नेतृत्वाखाली संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. कराची किंग्सचा पुढील सामना 9 एप्रिल रोजी पेशावर झल्मीविरुद्ध होणार आहे. वैयक्तिक रजेवर असताना घडलेल्या या प्रकरणामुळे फ्रँचायझी व्यवस्थापन आता खेळाडूंच्या रजेबाबत कठोर पावले उचलण्याची शक्यता आहे.



























































