
उत्तर प्रदेशातील दिव्या सिंग या महिलेने काठमांडू ते एव्हरेस्ट बेस कॅम्पसपर्यंतचा अवघड प्रवास सायकलने पूर्ण केला आहे. अशी कामगिरी करणारी दिव्या ही हिंदुस्थानातील पहिली महिला ठरली आहे. कमी होत जाणारी ऑक्सिजनची पातळी, बर्फाळ वारे याची तमा न बाळगता दिव्याने 17 हजार 560 फूट अंतर सायकलने पार केले.


























































