
काँग्रेस पक्षातून निलंबित केल्यानंतर नवजोत कौर सिद्धू यांनी नवा पक्ष काढला आहे. त्यांच्या पक्षाचे नाव भारतीय राष्ट्रवादी पार्टी ठेवले आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीला अवघे एक वर्षे राहिले असताना त्यांनी या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. पंजाब राज्याला पूर्वीचे गौरव प्राप्त करून देण्याचे आश्वासन दिले आहे. नवजोत कौर या माजी क्रिकेटपटू नवजोत सिंह सिद्धू यांच्या पत्नी आहेत. नव्या राजकीय पक्षाची घोषणा करताना त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत शेअर केली आहे. आपले पुढील आयुष्य देशाला समर्पित करणे आणि लोकांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याचे काम करणार असल्याचे त्या म्हणाल्या.


























































