
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचे पासपोर्ट असल्याचा आरोप काँग्रेस प्रवत्ते पवन खेरा यांनी केला होता. या आरोपानंतर आसाम पोलिसांनी अवघ्या दोनच दिवसात खेरा यांच्या दिल्लीतील घरावर छापेमारी केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी खेरा यांच्या घरातून काही कागदपत्रे व इलेक्ट्रॉनिक उपकरणेदेखील जप्त केली. या छापेमारीवेळी खेरा हे घरात नव्हते. हिमंता यांच्या पत्नीने दाखल केलेल्या एफआयआरनंतर ही कारवाई करण्यात आली.





























































