खटला रद्द करा! अदानींची अमेरिकेच्या कोर्टात धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने (सेक) दाखल केलेला फसवणुकीचा खटला रद्द करण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी यांनी अमेरिकेच्या न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायिक अधिकारक्षेत्राच्या उल्लंघनाच्या आधारे अदानी यांनी ही याचिका दाखल केली आहे.

सेकने नोव्हेंबर 2024 मध्ये अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर यांच्यावर लाचखोरी आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप करत खटला दाखल केला होता. अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळले असून न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्ट कोर्टात खटला रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे.