Us Israel Iran War – अमेरिका-इराणमध्ये शस्त्रसंधीची घोषणा, कश्मीरमध्ये जल्लोष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिनाभराहून अधिक काळ सुरु असलेल्या अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमधील युद्ध अखेर दोन आठवड्यांसाठी थंडावले आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये शस्त्रसंधीची घोषणा करताच कश्मीरमध्ये जल्लोष साजरा करण्यात येत आहे. कश्मीरमधील नागरिक याला ‘इस्लामिक प्रजासत्ताकाचा विजय’ असे मानत आहेत.

कश्मीरच्या विविध भागांत विशेषतः खोऱ्यातील शिया-बहुल भागांमधील नागरिक या शस्त्रसंधीचा आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यांवर जमले आहेत. शहरातील सैदाकदल आणि जादिबल या भागांत तसेच खोऱ्यातील बडगाम, बारामुल्ला, गांदरबल, पुलवामा आणि बांदीपोरा या जिल्ह्यांमध्ये जल्लोष सुरू आहे.