Us Israel Iran War – शस्त्रसंधीनंतर इराणच्या तेल शुद्धीकरण कारखान्यात मोठा स्फोट, कारण अद्याप अस्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात बुधवारी सकाळी शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली आहे. सकाळी शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर दुपारी इराणमधील लावान बेटावरील तेल शुद्धीकरण कारखान्यात स्फोट झाल्याची घटना घडली. शस्त्रसंधीनंतर इराणमधील हा पहिलाच स्फोट आहे. स्फोटाचे कारण अद्याप समजले नाही. इराणी वृत्तसंस्थेने या घटनेची माहिती दिली आहे.

इराणचे लावान बेट हे पर्शियन आखातातील होर्मोझगान प्रांतात वसलेले सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे बेट आहे. हे इराणच्या प्रमुख कच्च्या तेलाच्या निर्यात केंद्रांपैकी एक आहे. येथे मोठ्या प्रमाणात तेलाची निर्यात आणि शुद्धीकरण केले जाते. लावान बेट होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेला अंदाजे 450 ते 500 किलोमीटर अंतरावर आहे.

स्फोटांच्या तीव्रतेबद्दल किंवा कारणाबद्दल अद्याप माहिती मिळाली नाही. इराणी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सिरी बेटावरही अनेक स्फोट झाल्याचे वृत्त आहे, परंतु या स्फोटांचे कारण अज्ञात आहे. आज तकने इराणी मीडियाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधीचे पालन करणे अत्यावश्यक आहे. इराणवरील कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.