अशोक खरात प्रकरण: अश्लील व्हिडीओची ऑनलाईन विक्री, 15 ते 20 रुपयांना विकले जातायत व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोंदू बाबा अशोक खरात याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओवरून अनेक AI व्हिडीओ देखील तयार करून व्हायरल केले जात आहेत. यात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक खरातचे अश्लील व्हिडिओ १५ ते २० रुपयांना विकले जात आहेत.

महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याला 17 मार्चला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्यावर आतापर्यंत 12 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये महिला अत्याचाराचे 8 तर आर्थिक फसवणुकीचे 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. साम टीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.

4650 लिंक हटवल्या

अशोक खरात प्रकरणातील पीडितांबाबत गोपनीयता आणि त्यांच्या संरक्षणासाठी सोशल मीडियातून पीडितांचे व्हिडीओ हटवण्यात आले आहेत. यामध्ये 4650 लिंकदेखील काढल्याची माहिती मंगळवारी एसआयटी चौकशी समितीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिली.

451 अकाऊंट बंद, सहा जणांना अटक

खरात प्रकरणाचा तपास सुरू असताना गोपनीयतेचा भंग करून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारी 451 अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहेत. तसेच पीडिताचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी आत्तापर्यंत सातपूर पोलीस ठाणे नाशिक शहर आणि कोपरगाव पोलीस ठाणे अहिल्यानगर या ठिकाणी दोन गुन्हे दाखल करून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.