
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर निशाणा साधत देशाच्या परराष्ट्र धोरणावरून गंभीर टीका केली आहे. “भाजपने आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे रसातळाला नेले आहे,” असे त्यांनी केले आहे. उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना ते असे म्हणाले आहेत.
अखिलेश यादव म्हणाले की, “एकेकाळी हिंदुस्थान विश्वगुरू होईल असे वाटत होते, मात्र सध्या पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले संबंध आणि परराष्ट्र धोरण अधिक मजबूत करत असल्याचे चित्र आहे. त्या तुलनेत हिंदुस्थान परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत कमकुवत दिसून येत आहे.”
ते पुढे म्हणाले की, “विश्वगुरू बनण्याचे जे स्वप्न होते, ती संधी गमावली आहे. जर हिंदुस्थान सुरू असलेले युद्ध थांबवण्यात यशस्वी झाला असता, तर आज जगामध्ये हिंदुस्थानचे स्थान विश्वगुरू म्हणून मानले गेले असते.”
#WATCH कानपुर, उत्तर प्रदेश: सपा प्रमुख अखिलेश यादव ने कहा, “भाजपा ने हमारी विदेश नीति चौपट कर दी है। एक बार तो लग रहा था भारत विश्व गुरू होगा लेकिन पाकिस्तान अंतरराष्ट्रीय स्तर पर संबंधों को अपनी विदेश नीति को मजबूत कर रहा है। भारत विदेश नीति में कमजोर दिखाई दे रहा है। जो विश्व… pic.twitter.com/RzEarft7Wu
— ANI_HindiNews (@AHindinews) April 8, 2026

























































