
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे अनेक महिन्यांपासून कारागृहात बंद आहेत. अल-कादरी ट्रस्ट प्रकरणात इम्रान खान हे आपल्या वकिलाला भेटू शकतात, असे आदेश इस्लामाबद हायकोर्टाने दिले आहे. हायकोर्टाच्या सुनावणीवेळी अधिवक्ता सलमान सफदर यांनी म्हटले की, या प्रकरणात इम्रान खान यांच्याशी चर्चा करणे गरजेचे आहे. मुख्य न्यायाधीश सरफराज डोगर आणि न्यायाधीश मोहम्मद आसिफ यांच्या खंडपीठाने भेटीची परवानगी दिली आहे.





























































