
दुबार मतदारांचा शोध घेण्यासाठी राज्यात मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेत एसआयचा प्रभावी वापर सुरू केला आहे. एसआयच्या मदतीने प्रत्येक मतदारांच्या चेहऱयाची प्रत्येक मतदाराच्या चेहऱयासोबत पडताळणी केली जाते. एक फोटो किमान नऊ ते दहा कोटी फोटोंसोबत पडताळला जाईल. यातून मालेगावमध्ये एका मतदाराची दुबार नव्हे तर तिबार नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्रात विशेष सखोल फेरतपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेतून प्रामुख्याने दुबार मतदार शोधण्यात येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने फेरतपासणीचे सुमारे 57 टक्के काम पूर्ण केले आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पुढाकार घेऊन या मोहिमेत एसआय वापर सुरू केला आहे. मतदार फेरतपासणी मोहिमेत एसआयआर एआयचा वापर करणारे महाराष्ट्र राज्य देशातील पहिलेच राज्य आहे. एसआयच्या मदतीने दुबार मतदार शोधण्याचे तंत्रज्ञान राज्यातून केंद्रीय निवडणूक आयोगालाही दिले जाणार आहे.
दुबार मतदारांची अचूक पडताळणी
अनेकदा दोन मतदारांचे नाव सारखे असते. अगदी वडिलांचे नावही तेच असल्याची अनेक उदाहरणे सापडली आहेत. त्यामुळे केवळ नावांवरून दुबार मतदारांची पडताळणी केली तर दहा टक्केच अचूक पडताळणी होते. पण एआयच्या मदतीने पडताळणी केली तर 99 टक्के अचूक पडताळणी होते. त्यामुळे चेहऱयाच्या पडताळणीसाठी एआयचा वापर सुरू केला आहे.
सी डॅकची घेतली होती मदत
2022मध्ये दुबार मतदार शोधण्याचे काम सी डॅकच्या मदतीने झाले होते. मतदारयादीतील एकसारखे दिसणारे पह्टो शोधण्याचे काम सी डॅकच्या मदतीने झाले होते. आता मात्र एआयचा वापर सुरू केला आहे.
एक फोटो दाढीवाला दुसरा दाढीविना
मालेगावमधील एका मतदार संघात एकाच व्यक्तीचे नाव चार मतदारयाद्यांमध्ये सापडले आहेत. त्याची आता पडताळणी सुरू आहे. या मतदाराच्या एका पह्टोत दाढी होती. तर दुसऱया फोटोत दाढी नव्हती पण एआयच्या मदतीमुळे हा तिबार मतदार असल्याचे आढळून आले. एका मतदाराची तीन ठिकाणी नोंदणी होती. तर अन्य एका मतदारसंघात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मतदाराची नावे वेगवेगळी होती, पण एकाच व्यक्तीचा फोटो होता. नावे वेगवेगळी पण फोटो एकाच व्यक्तीचा असल्याचे आढळून आले. हे दुबार मतदार असल्याचा संशय आहे. पुढे अधिक पडताळणी करून दुबार मतदार वगळण्यात येतील, असे सूत्रांनी सांगितले.





























































