31 मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करा, अन्यथा कंत्राटदाराला दंड, कारवाई; पालिका प्रशासनाचे सक्त निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळा सुरू होण्यास अवघे दोन महिने शिल्लक राहिले असताना आतापर्यंत केवळ सुमारे 10 टक्केच नालेसफाई झाली आहे. त्यामुळे कामाचा वेग वाढवून 31 मेपर्यंत नालेसफाईचे काम पूर्ण करा, अन्यथा दंड आणि कारवाई होईल, असा इशारा पालिका प्रशासनाने कंत्राटदारांना दिला आहेत.

पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी आज शहर विभागातील नाले आणि मिठी नदीच्या सफाईची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. त्यांनी वांद्रे-पुर्ला संपुलातील एमएमआरडीए कार्यालयाजवळील जेतवन उद्यान येथे मिठी नदी, वरळीतील नेहरू विज्ञान केंद्र नाला, दादर धारावी नाला येथे सुरू असलेल्या स्वच्छता कामांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. वरळीतील नेहरू विज्ञान केंद्र नाल्यातून गाळ काढण्याचे काम कधी सुरू झाले आणि कधीपर्यंत पूर्ण होणार आहे, याची माहिती आयुक्तांनी घेतली. यावेळी उप आयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, पर्जन्य जलवाहिन्या प्रमुख अभियंता कल्पना राऊळ, उप प्रमुख अभियंता संजय इंगळे यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते.

असे होतेय काम

n पालिकेने यावर्षी पावसाळ्याआधी 841799.07 मेट्रिक टन गाळ उपसण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या कामात आतापर्यंत 74114.27 मेट्रिक टन म्हणजेच केवळ 8.80 टक्केच गाळ काढण्यात आला.

n सखल भागात पाणी साचणाऱ्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात, मॅनहोल सुरक्षित असल्याची खातरजमा करावी, वारंवार कचरा टाकणाऱ्या नाल्यांची सफाई एकापेक्षा जास्त वेळा करण्यात येणार आहे.