
सेल्फी घेताना तोल जाऊन धबधब्यात कोसळून तीन मैत्रिणींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील मुलुगुम्मी धबधब्याजवळ ही घटना घडली. त्रिशा (17), रत्ना कुमारी (16) आणि पवित्रा (16) अशी मयत मुलींची नावे आहेत. अन्य दोन मुली सुरक्षित आहेत.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, जांबवलासा गावातील पाच मुली मुलुगुम्मी धबधब्यावर सहलीला गेल्या होत्या. यादरम्यान, धबधब्यावरील मोठ्या खडकावर उभ्या राहून तिघी जणी सेल्फी घेत होत्या. यावेळी त्यांचा पाय घसरला आणि त्या धबधब्यात कोसळल्या.
एका खडकावर चढून सेल्फी काढले जात होते. धबधब्यावर उपस्थित नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. तिघींचेही मृतदेह सापडले आहेत. घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तिघींचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलीस पुढील तपास करत आहेत.
सेल्फी घेण्याचा मोह बेतला जीवावर, आंध्र प्रदेशात 3 अल्पवयीन तरुणींचा बुडून मृत्यू… थरकाप उडवणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद pic.twitter.com/rriP9KvkL1
— Saamana Online (@SaamanaOnline) April 10, 2026

























































