पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने जीवन संपवले, फेसबुकवर पोस्ट करत उचलले टोकाचे पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पत्नीचा आणि तिच्या नातेवाईकांचा त्रास अनावर झाला आहे, या त्रासाला कंटाळूनच आपण आत्महत्या करत आहोत अशी फेसबुक पोस्ट व्हायरल करत युवकाने आपले जीवन संपवले. फेसबुक पोस्ट व्हायरल होताच अनेकांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्या आधीच त्याने आपले टोकाचे पाऊल उचलले होते.

बीडच्या परळी तालुक्यातील नागापूर येथील रामेश्वर गव्हाणे यांनी आपल्या शेतात औषध घेऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रामेश्वर याने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर पोस्ट केली. यामध्ये त्याने त्याची पत्नी नातेवाईकांपासून त्रास असल्याचे लिहिले आहे. तसेच या पोस्टमध्ये काही डॉक्टर आणि वकिलांच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात आलाय. फेसबुक पोस्ट नंतर त्याच्याशी अनेकांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. काही वेळातच त्याच्या आत्महत्येची बातमी समोर आली.