
बीड जिल्ह्यातील शांतीवन (ता.शिरूर कासार) येथे ४५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज (शुक्रवार) उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन झाले. साहित्य, समाजकार्य आणि संवेदनशील विचारांचा संगम साधणार्या या संमेलनाला राज्यभरातील साहित्यिक, विचारवंत आणि रसिकांची मोठी उपस्थिती लाभली. पुस्तके वाचणार्यांची संख्या कमालीची कमी झाली आहे. भावी पिढी मोबाईलच्या विळख्यात सापडली आहे. त्यांना परत वाचनाकडे आकर्षित करायचे असेल तर लेखक आणि साहित्यिकांनी वैज्ञानिक दृष्टीकोण आणि सामाजिक प्रश्नाला वाचा फोडणारे लिखाण केले पाहिजे असे स्पष्ट मत डॉ.दिंगत प्रकाश आमटे यांनी केले.
संमेलनाच्या उद्घाटनाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने ग्रंथपूजन आणि ध्वजवंदनाने झाली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला. यंदाच्या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक प्रा.फ.म.शहाजिंदे यांनी भूषवले असून, त्यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाची साहित्यविश्वात उत्सुकता आहे. उद्घाटन सोहळ्यास डॉ.दिगंत आमटे, डॉ.अनघा आमटे, डॉ.गिरीश कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. तसेच माजी मंत्री सुरेश धस, आयएएस अधिकारी भारत ससाणे आणि अनेक नामवंत साहित्यिक यावेळी उपस्थित होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष फ.म.शहाजिंदे बोलताना म्हणाले, साहित्यातील विविध प्रवाहांनी वंचित, उपेक्षित घटकांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली पाहिजे असे त्यांनी म्हटले. पहिल्याच दिवशी विविध साहित्यिक उपक्रमांनी संमेलनाची रंगत वाढवली. बालसाहित्य पुरस्कार वितरण, कथाकथन सत्र आणि ‘मराठवाड्यातील आजचे लेखन किती दर्जेदार?’ या विषयावर परिसंवाद यामुळे साहित्यिक चर्चांना उधाण आले. सायंकाळी आयोजित कवीसंमेलनात कवींच्या ओजस्वी आणि भावस्पर्शी काव्यरचनांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
शांतीवनसारख्या सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणार्या ठिकाणी हे संमेलन होत असल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. साहित्य आणि समाजकारण यांचा मेळ साधणार्या या संमेलनातून सामाजिक जाणिवा अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, दोन दिवस चालणार्या या संमेलनात विविध परिसंवाद, कवीसंमेलने आणि साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून, मराठवाड्यातील साहित्य चळवळीला नवी दिशा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
हे होते उपस्थित
डॉ.अनघा दिंगत आमटे, गिरीश कुलकर्णी, कौतुकराव ढाले पाटील, दादा गोरे, आसाराम लोमटे, रामचंद्र काळुंखे, दिपाताई क्षीरसागर, दत्ता बारगजे, संतोष गर्जे यांच्यासह साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
लेखनाच्या दर्जावर जोरदार चर्चा
पहिल्याच दिवशी विविध साहित्यिक उपक्रमांनी संमेलनाची रंगत वाढवली. बालसाहित्य पुरस्कार वितरण, कथाकथन सत्र आणि ‘मराठवाड्यातील आजचे लेखन किती दर्जेदार?’ या विषयावर परिसंवाद यामुळे साहित्यिक चर्चांना उधाण आले. सायंकाळी आयोजित कवीसंमेलनात कवींच्या ओजस्वी आणि भावस्पर्शी काव्यरचनांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ़ग्रामीण वास्तव आणि बदलत्या जीवनशैलीचे प्रभावी चित्रण कथाकथनाच्या भावविश्वासातून प्रभावी उधळण करण्यात आली. कथाकारांच्या जिवंत सादरीकरणाने वातावरण अधिक रंगले. यात सामाजिक प्रश्नावर थेट भाष्य करणारी मांडणी करण्यात आली. श्रोत्यांनीही टाळ्यांच्या गजरात दिली उत्स्फुर्त दाद.
शांतीवनात साहित्याचा जल्लोष
शांतीवनसारख्या सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणार्या ठिकाणी हे संमेलन होत असल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. साहित्य आणि समाजकारण यांचा मेळ साधणार्या या संमेलनातून सामाजिक जाणिवा अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अत्यंत नैसर्गिक वातावरणामध्ये सुरू असलेल्या या मराठवाडा साहित्य संमेलनात साहित्याचा गजर आणि निसर्गाचा मोहक अंदाज याचा मिलाफ झाला आणि साहित्याचा जल्लोष झाला.
शांतीवनची ५० पेक्षा अधिक मुलं डॉक्टर झाली
या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष दीपक नागरगोजे यांनी मनोगत व्यक्त करताना मन असल्याशिवाय लिहिता येत नाही. दुष्काळी भागात शांतीवन अनाथ आणि वंचित निराधार बालकांच्या पुनर्वसनासाठी काम करत आहे. ते काम साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी पाहावे या ठिकाणी संमेलन आयोजित केले. शांतीवनच्या माध्यमातून ५० पेक्षा अधिक मुले एमबीबीएस झाले आहेत. इतर क्षेत्रातही ते पुनर्वसीत केले आहेत. त्यांची झेप नेत्रदीपक ठरली आहे असे दीपक नागरगोजे यांनी म्हटले.
स्क्रीनकडून पुस्तक आकडे हा प्रवास आपल्या घडवून आणायचा आहे-अनघा आमटे
शांतीवनात आल्यावर मला हातात पुस्तके असणारी मुले दिसली. शांतीवनात आहे की आनंदवनात असा प्रश्न मला पडला. स्व.बाबा आमटे यांचे विचार पुढे नेण्याचे काम केवळ आमटे परिवारच करत नाही तर दीपक नागरगोजे आणि शांतीवन प्रकल्पही करीत असल्याचा गौरवोल्लेख डॉ.अनघा आमटे यांनी केला. वाचन संस्कृती वाढली पाहिजे. लहान मुलांना स्क्रीनपासून दूर करत पुस्तकाकडे घेवून जावे लागेल यासाठी साहित्यात विज्ञान आले पाहिजे. मुलांची आवड काय आहे हे ओळखून मुले पुस्तकाकडे कशी वळतील ते बघीतले पाहिजे असे डॉ.अनघा आमटे म्हणाल्या.


























































