
आखाती युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठय़ावर मोठा परिणाम झाला आहे. याचा फटका हॉटेल इंड्रस्टीला बसला आहे. अनेक स्ट्रीट फूड व्यवसाय बंद झाले आहेत. खाण्याच्या किमती वाढल्या आहेत. अशातच युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईवर एका पुणेकराने पुणेरी टोला लगावला आहे. सोशल मीडियावर ही पुणेरी पाटी व्हायरल होत आहे. मीनाक्षी नावाच्या टी-स्टॉलवाल्याने पाटीवर लिहिलेय की, ‘प्रिय ग्राहक, गॅसची टाकी द्या आणि युद्ध संपेपर्यंत फुकटात चहा प्या ’ यावर एक टीपही देण्यात आली आहे. ‘गॅस टाकी फुकट घेणार नाही, त्याचे पैसेही दिले जातील.’




























































