IPL 2026 – हसरंगा बाहेर अन् लखनौत लिंडेची एण्ट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लखनौ सुपर जायंट्स संघाला मोठा धक्का बसला असून वानिंदु हसरंगा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडला आहे. आता त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॉर्ज लिंडेची संघात निवड करण्यात आली आहे.

श्रीलंकेच्या पहिल्या सामन्यात हसरंगाला मांडीच्या स्नायूची दुखापत झाल्याने त्याला माघार घ्यावी लागली. लखनौने त्याला दोन कोटी रुपयांना खरेदी केले होते, मात्र आता त्याची उणीव भरून काढण्याची जबाबदारी लिंडेवर असेल. डावखुरा फलंदाज आणि डावखुरा मंदगती गोलंदाज असलेल्या लिंडेने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. तो आतापर्यंत 3 कसोटी, 4 एकदिवसीय आणि 37 टी-20 सामने  खेळला आहे. या प्रकारात त्याच्या नावावर चारशेहून अधिक धावा आणि 35 विकेट आहेत. विशेष म्हणजे, दोनशेपेक्षा अधिक टी-20 सामन्यांचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे. लिंडेसाठी ही स्पर्धा पहिल्यांदाच खेळण्याची संधी असून, एक कोटी रुपयांच्या मूळ किमतीत त्याचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, संघ व्यवस्थापनाने आधीच हसरंगा उपलब्ध नसण्याची शक्यता व्यक्त केली होती आणि पर्यायाच्या शोधात असल्याचे स्पष्ट केले होते.