थलपती विजयचा ‘जन नायगन’ चित्रपट लीक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दाक्षिणात्य अभिनेता आणि तमिळगा वेत्री कळघम पक्षाचा सर्वेसर्वा थलपती विजय याचा अखेरचा चित्रपट ‘जन नायगन’ या चित्रपटासाठी सेन्सॉर बोर्डाकडून सर्टिफिकेट मिळवण्याची कायदेशीर लढाई सुरू असताना हा चित्रपट एचडीमध्ये लीक झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल करण्यात आली आहे. चित्रपट लीक होण्याआधी सोशल मीडियावर चित्रपटाचे शीर्षक क्रेडिट्स, विजयचा एन्ट्री सीन आणि क्लायमॅक्सचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. यावर कारवाई करत निर्मात्यांनी व्हिडीओ हटवले, परंतु काही वेळात संपूर्ण चित्रपटच पायरेटेड साइट्सवर उपलब्ध झाल्याने निर्मात्याला प्रचंड धक्का बसला. विकीपीडिया पेजवरही लीक झालेल्या लिंकचा समावेश करण्यात आला होता.