
वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाली आहे. 60 टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी आहे, असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या संमेलनानिमित्त एक स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. यामध्ये देण्यात आलेल्या लेखात शरद पवार यांनी वारकरी परंपरेतील बदलत्या प्रवाहांवर भाष्य केले. त्यांच्या मते, वारकरी संप्रदायातील 60 टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी होत आहे. समतेचा आणि प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या वारकरी चळवळीमध्ये अशा विचारांची वाढ होणे चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.


























































